नगर : झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawade) आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांनी आज सप्तपदी घेतली आहे. दोघांनीही त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केली आहे. केळवणाचा फोटो शेअर करत तितिक्षाने त्यांच्या लग्नाची माहिती दिली होती. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला होता. तसेच त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. तर आता तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला त्यांच्या कलाविश्वातील मित्रमैत्रिणींनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, सुरुची अडारकर, ऐश्वर्या नारकर ही कलाकार मंडळी तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला हजर होती. आता तितिक्षा आणि सिद्धार्थच्या या नव्या आयुष्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नक्की वाचा : ‘तेरवं’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; नितीन गडकरींच्या हस्ते ट्रेलर लॉन्च
तितिक्षा आणि सिद्धार्थचा लग्न सोहळा (Titeeksha Tawde Wedding)
तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काल (ता. २५) तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली होती. हळद, साखरपुडा, संगीत असे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
अवश्य वाचा : आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक
तितिक्षा आणि सिद्धार्थची प्यारवाली लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Wedding)
तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये होते. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तितीक्षाने सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो ‘दृश्यम २’ या बॉलिवूडपटात झळकला होता.