Uddhav Thackeray : श्रीरामपूर : विदर्भात गारपीट झाली, शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी अश्रू ढाळत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते शेतकऱ्यांच्या दारात गेले नाहीत तर मोदींच्या दारात गेले. आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना झोप येत नव्हती आता ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश म्हणजे संघाच्या आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना धक्का असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते श्रीरामपूर येथे आयोजित शिवसंवाद व कुटुंब मेळाव्यात ते बोलत होते.
नक्की वाचा: अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला माहित आहे – देवेंद्र फडणवीस
सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये (Uddhav Thackeray)
यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन बडदे, संजय छल्लारे, डॉ. महेश क्षीरसागर लखन भगत, राधाकिसन बोरकर, रमेश घुले, एकनाथ गुलदगड, सदाशिव पठारे, शारदा कदम, कल्पना वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी भाजप असा तो पक्ष झाला आहे. ज्यांनी भ्रष्टाचारात डीलर म्हणून काम केले आहे, त्यांनाच भाजपचे लीडर केले जात आहे. सडलेली पाने झडतात ते झडलेच पाहिजे, जे घाबरट आहेत ते भारतीय जनता पार्टीत जात आहेत. मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजपमध्ये नाही का? स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर पक्षातून लोक आयात केले जात आहेत. कोरोनामध्ये व्हायरस होता, त्याला बाजूला ठेवण्यासाठी आपण हात धुवायचो, आता देशात एकाधिकार शाहीचा व्हायरस आला आहे. त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि त्याच्यामागे हात धुवून लागा.
हे देखील वाचा: उठता, बसताही येईना; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, गावकऱ्यांसह सहकारी चिंताग्रस्त
पक्ष अडचणीत असतांना पळकूटे पळून जातात (Uddhav Thackeray)
खासदार संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या स्वागताने श्रीरामपुरात दुसरी अयोध्या अवतरली. राज्यात सत्याचे शिवधनुष्य घेऊन ठाकरे लढत आहेत. राज्यकर्ते पक्ष फोडायला, गुंडगिरीत अडकले, मोठा नेता फोडायचा, पक्षात घ्यायचा, आरोप विसरायचा त्याचा जयजयकार करायचा, अजित पवार यांना काकाने सर्व दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांनी सर्व दिले, अशोक चव्हाण यांना काँग्रेसने सर्व दिले मात्र ते पळून गेले. पक्ष अडचणीत असतांना पक्षाला साथ द्यायची असते मात्र पळकूटे पळून जातात, भाजपचं वाईट वाटते, भ्रष्ट नेते पक्षात घेऊन पक्ष वाढवायचा, भाजप कुठे राहिला आहे, भाजपची आता भ्रष्ट काँग्रेस झालीच असे राऊत म्हणाले.