Uddhav Thackeray : भाजपचं हिंदुत्त्व घरं पेटवणारं; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

Uddhav Thackeray : भाजपचं हिंदुत्त्व घरं पेटवणारं; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

0
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नेवासे : भाजप (BJP) आणि शिवसेनेची युती (Alliance) ही २५ वर्षे हाेती. मात्र, त्यांच्याबराेबर केलेली युतीतील वर्षे अक्षरक्षः सडली आहेत. आम्ही हिंदुत्त्वासाठी युती केली. मात्र, त्यांचं हिंदुत्त्व (Hinduism) घर पेटवणारं आहे. आमचं हिंदुत्त्व सामान्यांची चूल पेटवणारं आहे, असा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. 

नक्की वाचा: अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला माहित आहे – देवेंद्र फडणवीस

शेतकरी हक्काच्या मागण्यांपासून वंचित (Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांचा आजपासून नगर जिल्हा दौरा सुरू झाला आहे. दुपारी नेवासा तालुक्यात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलताना म्हणाले, ” लाखांचा पाेशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या हक्काच्या मागण्यांपासून वंचित ठेवून त्याला दिल्लीत येण्यापासून राेखलं जात आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो, अशा भाजपला आगामी निवडणुकीत जनता अजिबात थारा देणार नाही.” अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

हे देखील वाचा: उठता, बसताही येईना; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, गावकऱ्यांसह सहकारी चिंताग्रस्त

जेसीबीमधून फुलांचा वर्षाव

दरम्यान, उद्धव ठाकरेंचं नगरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या कारवर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार शंकरराव गडाख, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here