Bhool Bhulaiyaa 3 :’भूलभुलैया ३’ मध्ये दिसणार विद्या बालन व माधुरी

भुलभूलैया ३' या  चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि विद्या बालन असणार आहेत. याहून सरप्राइज म्हणजे या चित्रपटात 'धक् धक् गर्ल' माधुरी दीक्षित देखील पाहायला मिळणार आहे.

0
Bhool Bhulaiyaa 3
Bhool Bhulaiyaa 3

नगर : हॉरर चित्रपटाच्या यादीत नाव असलेल्या ‘भुलभूलैया’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या सीरिजचा आता तिसरा भाग येणार आहे. ‘भुलभूलैया ३’ या  चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि विद्या बालन (Vidya Balan) देखील असणार आहेत. याहून मोठं सरप्राइज म्हणजे या चित्रपटात ‘धक् धक् गर्ल’ माधुरी दीक्षित देखील (Madhuri Dixit) पाहायला मिळणार असल्याचं वृत्त आहे.

नक्की वाचा : भरत जाधव यांची झी मराठीच्या ‘पारू’ मालिकेत एन्ट्री

माधुरी दीक्षितची विशेष भूमिका (Bhool Bhulaiyaa 3)

दिग्दर्शक अनीस बज्मी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित ही भूताची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटातील कथानकाला एक खास वेगळं देण्यासाठी माधुरीची निवड करण्यात आली आहे.

रुह बाबा करणार भूतांचा सामना

माहितीनुसार, या चित्रपटात रूह बाबा विरुद्ध माधुरी दीक्षित आणि विद्या बालन साकारत असलेल्या भूतांचा सामना होणार आहे. दोन्ही दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणत दिग्दर्शकाने आता हुकूमाचा एक्का काढला असल्याचे म्हटले जात आहे.  ‘भुलभूलैया -३’ मध्ये रुह बाबा साकारणाऱ्या कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान झळकणार आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अक्षय कुमार या चित्रपटात काम करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र अक्षय या चित्रपटात नसला तरी अनीस त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. ‘भुलभूलैया ३’ मध्ये राजपाल यादव आणि संजय मिश्रासोबत माधुरी आणि विद्या बालन यांच्याही भूमिका आहेत. ‘भुलभूलैया३’ हा येत्या तीन महिन्यात फ्लोरवर जाणार असल्याची माहिती आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुमारास अथवा वर्ष अखेरीस रिलीज होणार आहे.

अवश्य वाचा : बॉलिवूड अभिनेता राहुल देव झळकणार ‘शिवरायांचा छावा’ मध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here