Sharad Pawar : शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

Sharad Pawar : शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

0
NCP

Sharad Pawar : नगर : भारतीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा निर्णय दिला. या निर्णयात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे घड्याळ हे निवडणूक चिन्हदेखील अजित पवार गटाला दिले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

NCP

नक्की वाचा: अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला माहित आहे – देवेंद्र फडणवीस

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर (Sharad Pawar)

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आज (१३ फेब्रुवारी) त्यासाठीची रितसर प्रक्रिया पार पाडण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना शरद पवार गटापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: उठता, बसताही येईना; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, गावकऱ्यांसह सहकारी चिंताग्रस्त

आजवर कधीही असे घडले नव्हते (Sharad Pawar)


दरम्यान, शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ज्यांनी पक्षाची स्थापना केली, त्यांच्याच हातातून तो हिसकावून घेतला आहे. भारताच्या इतिहासात असा प्रकार कधीही घडला नव्हता. मात्र निवडणूक आयोगाने ते करून दाखवले, असे शरद पवार १२ फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलताना म्हणाले. शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here