Uddhav Thackeray : ‘मविआ’चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : 'मविआ'चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे

0
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नगर : आगामी विधानसभा निवडणुकीचे (c) सर्व राजकीय (Political) पक्षांना वेध लागले आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीका व राजकीय कुरघोडींनी वेग घेतला आहे. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. या अनुषंगानेच मुंबईत (Mumbai) महाविकास आघाडीचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला.

नक्की वाचा: नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : मंत्री विखे पाटील

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो (Uddhav Thackeray)

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल? यावरून चर्चा सुरु आहेत. या आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो.”

अवश्य वाचा: श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here