Unseasonal Rain : नगर : जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) वादळाच्या (Storms) तडाख्यामुळे जिल्ह्यातील ६९२ शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) व फळबागांचे नुकसान झाले आहे. २५० शेतकऱ्यांचे ११५.५५ हेक्टरवरील फळबाग, भाजीपाल्यासह चारा पिकांचे नुकसान झालेले आहे.
नक्की वाचा : वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट; खा. नीलेश लंके यांचा आरोप
मे महिन्यात देखील अवकाळीचा तडाखा सुरूच
जिल्ह्यात अवकळी, गारपीट व वादळाचा तडाखा सुरू आहे. एप्रिल महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर आता मे महिन्यात देखील अवकाळीचा तडाखा सुरू आहे. मे महिन्यात ता.५ पासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. विशेषतः पाथर्डी, अकोले आणि नगर तालुक्यात ३५ गावांमधील २५० शेतकऱ्यांचे ११५.५५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. यात १८३ शेतकऱ्यांचे ७० हेक्टर वर ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर ६७ शेतकऱ्यांचे ४५.५५ हेक्टरवर नुकसान झाले.
अवश्य वाचा : ‘कर्जासाठी शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकाना फटकारले
कृषी विभागाकडून पिकांचे पंचनामे सुरू (Unseasonal Rain)
जिल्ह्यात ९ ते १२ मे यादरम्यान वादळाचा सर्वाधिक तडाखा पाथर्डी तालुक्यातील २४ गावांना बसला असून या ठिकाणच्या १०६ शेतकऱ्यांचे ७३.६० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. अकोले तालुक्यातील सहा गावात ७३ शेतकऱ्यांचे १८.३५ हेक्टर वरील पिकांची नुकसान झालेले आहे. नगर तालुक्यातील पाच शेतकर्यांची पाच हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. अवकाळीचा तडाखा बसलेल्या पिकांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू कृषी विभागाकडून सुरू आहे.
जिल्ह्यात ता.१६ पासून पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढला. संगमनेर, राहुरी, नेवासे, कर्जत, पारनेर, जामखेड या तालुक्यांतील अनेक गावांना अवकाळीचा फटका बसला. जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. या पावसाचा १२१ शेतकऱ्यांना फटका बसला असून ४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
फळबागांचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा, पपई, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंब, जांभूळ आणि केळी या फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा, टोमॅटो, उन्हाळी बाजरी, मिरची पिकांचे ही नुकसान झालेले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या २३ पर्यंत अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी पिकांसह पशुधन याची काळजी घ्यावी. अवकाळी पावसात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा.
डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
Table of Contents