Baby John Poster: वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चे पोस्टर आऊट; वरूनच अँग्री लूक पहाच! 

वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बेबी जॉन'चे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमधील वरुण धवनचा लूक चाहत्यांना आवडला आहे.

0
Baby John Poster
Baby John Poster

नगर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे (Baby John Movie) चर्चेत आहे. सोमवारी (ता.५) ॲटलीने या चित्रपटाच्या टायटलसोबत धमाकेदार टीझर आऊट केला होता. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आऊट करण्यात आला आहे. नुकताच रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये वरुण धवनचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे हे पोस्टर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

नक्की वाचा : भक्षक’मध्ये सई ताम्हणकर साकारणार पोलिसाची भूमिका   

वरुण धवनने ‘बेबी जॉन’ मधील लूक चर्चेत (Baby John Poster)

वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बेबी जॉन’चे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील वरुण धवनचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. हातामध्ये शस्त्र घेतलेला आणि चिडलेला वरुण धवनचा हा लूक पहिल्यांदाच सर्वांनी पाहिला असेल. या पोस्टरच्या बॅकग्राऊंड मध्ये विलन दिसत आहे. बेबी जॉनचे पोस्टर शेअर करत वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘घट्ट पकडून ठेवा. प्रवास एकदम खतरनाक होणार आहे.

अवश्य वाचा :नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार

कॅलिसने सांभाळली ‘बेबी जॉन’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी (Baby John Poster)

‘बेबी जॉन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कॅलिसने सांभाळली आहे. ॲटली, मुराद खेतानी ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे कीर्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ३१ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here