नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) गुरुवारी (ता. १८) जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील (Vinayak Patil) याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर मुलींमध्ये पूजा वंजारी हिने बाजी मारली आहे.
नक्की वाचा : मराठा समाजाचं ‘या’ दिवसापासून होणार सर्वेक्षण
एमपीएससीची गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Result)
एमपीएससीने ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर याने राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्राजक्ता पाटील ही राज्यात मुलींमध्ये दुसरी तर अनिता ताकभाते हीने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा इराणवर हल्ला; दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा
उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा लागणार (MPSC Result)
विशेष म्हणजे राज्यसेवेच्या ६१३ पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. आता उमेदवारांना २९ जानेवारी पर्यंत पसंतीक्रम द्यायचा आहे. २२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे. राज्यसेवेमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम जवळपास १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.