Warning : नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा

मुख्याधिकारी (Principal) ढोरजकर आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अन्यथा मुख्याधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे निवेदन आरपीआय (hunger strike) तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप (Rajabhau Jagtap) यांनी तहसीलदारांना दिले. 

0
Warning : नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा
Warning : नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा

Warning : श्रीगोंदा : नगरपरिषदसमोर (municipal council) शहरातील रस्त्याबाबत व निकृष्ट कामाबाबत उपोषण (hunger strike) सुरू असताना मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी उपोषणकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरून अपमान केल्याचा आरोप करत मुख्याधिकारी (Principal) ढोरजकर आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अन्यथा मुख्याधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे निवेदन आरपीआय (hunger strike) तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप (Rajabhau Jagtap) यांनी तहसीलदारांना दिले. 

हे देखील वाचा : कर्जत तालुक्यात विवाहितेचा खून

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील निकृष्ट कामाबाबत श्रीगोंदा नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे २० नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषद येथे शांततेच्या मार्गाने उपोषण सुरु होते. श्रीगोंदा शहरातील रस्त्याबाबत व निकृष्ट कामाबाबत आम्ही ढोरजकर यांचेकडे वारंवार पाठपुरावा करत पत्र व्यवहार केला तसेच जिल्हाधिकारी आणि नगर विकास सहआयुक्त यांचेकडे तक्रार केल्याचा राग येऊन मुख्याधिकारी ढोरजकर यांनी आरपीआय कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरून अपमान केला, असा आरोप करण्यात आला आहे.

नक्की वाचा : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणे बाबत वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक असताना मुख्याधिकारी ढोरजकर यांनी कारवाई न करता उपोषण कर्त्याना अपमानित केले. भ्रष्ट ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी ढोरजकर यांना २७ नोव्हेंबरनंतर दिसेल तिथे तोंडाला काळे फासण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here