Murder : पत्नीचा खून करणारा पती गजाआड

अनैतिक संबंधाचा संशय घेत जाब विचारल्याने पत्नीचा खून (Murder) करण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला. पत्नीचे प्रेत पुरून विल्हेवाट लावण्याऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद (arrested) केले. 

0
148
Murder : पत्नीचा खून करणारा पती गजाआड
Murder : पत्नीचा खून करणारा पती गजाआड


Murder : नगर : अनैतिक संबंधाचा संशय घेत जाब विचारल्याने पत्नीचा खून (Murder) करण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला. पत्नीचे प्रेत पुरून विल्हेवाट लावण्याऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद (arrested) केले. 

हे देखील वाचा : कर्जत तालुक्यात विवाहितेचा खून


पारगाव सुद्रिक येथील रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) या हरविल्या असल्याची फिर्याद तिचे पती ज्ञानदेव पोपट आमटे याने दिली होती. त्यानंतर ज्ञानदेव पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात आमटे यांच्या घराजवळच रुपालीचा मृतदेह पुरलेला आढळून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत आरोपी ज्ञानदेवचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने शोध घेतला. यात आरोपी गुजरात राज्यात असल्याचे आढळून आले. तेथील सीसीटीव्हीच्या आधारे पथकाने शोध घेत ज्ञानदेवला ताब्यात घेतले. 

नक्की वाचा : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी


पथकाने ज्ञानदेवकडे अधिक तपास केला. ज्ञानदेव हा कंत्राटी व्यवसायानिमित्त नेहमी बाहेरगावी जायचा. रुपालीला ज्ञानदेवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे ती ज्ञानदेवशी नेहमी भांडण करायची. याचा राग आल्याने त्याने रुपालीचा गळा आवळून खून केला. प्रेत घराजवळ खड्डा करून पुरले असल्याची कबुली त्याने पथकाजवळ दिली. त्यानुसार पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीला पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here