Bageshwar Dham Dhirendra Shastri : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी

‘भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र (Hindu Rashtra) निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांनी मांडली.

0
253
Bageshwar Dham Dhirendra Shastri : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी
Bageshwar Dham Dhirendra Shastri : हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी

Bageshwar Dham Dhirendra Shastri : नगर : ‘भारतीय राज्यघटनेत (Constitution of India) आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र (Hindu Rashtra) निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांनी मांडली.

हे देखील वाचा : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र

पुण्यात पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला. मी सुद्धा संविधानाचा स्वीकारतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदुराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली, तर त्यात काय वाईट आहे?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. “सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदुराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदुराष्ट्र होईल,” असा विश्वासही धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केला.

नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार

हिंदुराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदुराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदुराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही… हिंदुराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल, तर तुमची तिरडी बांधली जाईल.” धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here