पाथर्डी : शहरासह तालुक्याच्या इतर भागात गुरुवारी (ता.११) सकाळी धुके ( Weather Alert) पडल्याने सूर्यनारायणाचे दर्शन पाथर्डीकरांना उशिरा झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत धुके पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. धुक्याच्या या वातावरणात (Climate) नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. रस्त्यावर सकाळी संचारबंदी सारखी (Curfew) परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र साडेनऊनंतर सूर्याची किरण उगवल्याने पुन्हा एकदा दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाले.
नक्की वाचा : अतिवृष्टीचे अनुदान वाटप भोवले; ‘या’ तालुक्यातील तहसीलदार झाले निलंबित
धुक्याची लाट (Weather Alert)
सकाळची शाळा असल्याने लहान विद्यार्थ्यांसह मोठ्यांना या धुक्यासह गार हवेचा सामना करावा लागला. या वातावरणाच्या बदलामुळे अनेक साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. या वातावरणामुळे लहान मुले सर्दी, खोकला या आजाराला बळी पडली आहे. धुके पडल्याने रस्त्यावर गाडी चालवणे ही गाडी चालकांना अवघड झाले होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात धुक्याची लाट सर्वत्र पसरल्याने काही अंतरावरच चित्रसुद्धा दिसेनासे झाले होते. या वातावरणाच्या बदलामुळे मनुष्यासह शेती पिकालाही मोठ्या प्रमाणात रोगांचा फटका बसला आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
धुक्याच्या पिकाचे नुकसान (Weather Alert)
पडलेल्या धुक्याच्या वातावरणाने सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान होणार आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात वेगवेगळे बदल होत आहे. धुक्याच्या पूर्वी गहू व बाजरी या पिकांवर रोग पडले आहे. या धुक्याच्या वातावरणाने पुन्हा एकदा शेतकऱ्याला संकटात टाकले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीची औषध फवारणी कांदा व इतर पिकांवर करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकाद आर्थिक संकटात सापडणार आहे. या वातावरणामुळे कांदा पिकावर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.