Weather Update : नगर : गेल्या २४ तासात देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी (Unseasonal Rain) लावली आहे. दक्षिण भारतासह कोकणाला पावसानं झोडपलंय. तसेच संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट (A Cold Snap) कायम आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूसह दक्षिण भारतातील काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा (Alert) जारी केला आहे.
नक्की वाचा : क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित
येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नागरिकांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. कारण पुढील ४८ तासात देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात गेल्या २४ तासांत कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आजपासून तापमानात थोडा बदल होताना पाहायला मिळणार आहे.
अवश्य वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!
उत्तर पश्चिम, मध्य भारतात आज कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. दक्षिण भारतात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. देशाच्या विविध भागात ११ जानेवारीपर्यंत पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याशिवाय कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो. गुजरातच्या पूर्व भागात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज १० जानेवारीला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.