Ram Temple : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही

Ram Temple : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही

0
Ram Temple : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही
Ram Temple : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही

Ram Temple : नगर : अयाेध्येतील राम मंदिराची (Ram Temple ) देशभर चर्चा सुरू आहे. त्यातच आता अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या मंदिराला १४ सुवर्णजडीत दरवाजे (Golden doors) लावण्यात येणार आहे. हैदराबादच्या (Hyderabad) अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कंपनीच्या कारागिरांनी राम मंदिरासाठी सुवर्णजडीत दरवाजे तयार केले आहेत.

हे देखील वाचा : देशावर अवकाळी पावसाचं संकट कायम

हैदराबादच्या कंपनीचे मालक शरद बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधत या मंदिराच्या दरवाज्याच्या कामाविषयी माहिती दिली. शरद बाबू यांनी सांगितलं की, ‘सुवर्णजडीत दरवाज्याविषयी बोलताना हैदराबाद कंपनीचे मालक शरद बाबू यांनी सांगितलं की, ”राम मंदिराचे दरवाजे नागर शैलीत तयार करण्यात आले आहेत. आमच्या कारागिरांना दरवाजा तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. राम मंदिरासाठी १४ सुवर्णजडीत दरवाजे रामनगरीत पोहोचले आहेत. या मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर मंदिर परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नक्की वाचा : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे

या सुवर्णजडीत दरवाजे लावण्याचं काम १५ जानेवारीपासून सुरु होईल. दरवाजा लावण्याचं काम लोकार्पण सोहळ्याच्या आधी पूर्ण होईल. सुवर्णजडीत दरवाजे १००० वर्षे खराब होणार नाहीत, असा दावा कंपनीच्या मालकाने केला आहे.” सुवर्णजडीत दरवाजासाठी गेल्या ६ महिन्यांपासून दिवसरात्र काम सुरु आहेत. या कामासाठी ६० कारागीर काम करत आहेत. शिफ्टनुसार हे कर्मचारी काम करत आहेत. कमी कालावधीत अधिक काम करणे एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. श्रीरामाच्या कृपेने काम वेळेत पूर्ण होत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here