Kite : पतंग उडवायचा आहे ना? आधी हे वाचाच…

Kite : पतंग उडवायचा आहे ना? आधी हे वाचाच…

0
Kite : पतंग उडवायचा आहे ना? आधी हे वाचाच…
Kite : पतंग उडवायचा आहे ना? आधी हे वाचाच…

Kite : नगर : मकर संक्रात (Makar Sankranti) म्हणजे आनंदाचा सण. या सणात सर्व वयोगटातील अनेक नागरिकांना रंगीबेरंगी पतंग (Kite ) उडविण्याचा मोह आवरता येत नाही. यावेळी उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो. त्यामुळे पतंग उडविताना काही दुर्घटना होऊ नये, याची सावधगिरी (Caution) बाळगण्यासाठी वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावे, असे आवाहन महावितरणने (Mahavitaran) केले आहे.

हे देखील वाचा : अयाेध्येतील राम मंदिरासाठी १४ साेन्याचे दरवाजे; १००० वर्षापर्यंत खराब होणार नाही

मकरसक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फीडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी. आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली आहे. दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, चायना मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नक्की वाचा : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे

शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघू  व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात, अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी पाइपाच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी अनेकदा विद्युत तारेला स्पर्श होऊन जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे प्राणांकित अपघात होताे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तित्वात आहेत. वीज वाहिन्यांच्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या वीज वाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी आहे. या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो, असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाही मांजा वापरु नये. नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा.

पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडवण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here