Winter session : नगर : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून नागरपूरमध्ये सुरु होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ऐन हिवाळ्यात अधिवेशनामुळे राजकीय (Political) वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण ट्रिपल इंजिन सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्षांना जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) सरकारकडून या आरोपांना देखील जशासतशी उत्तरे दिली जाण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : नेवासा वकील संघाचा रास्ता रोकोचा इशारा
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ११ हजार पोलिस तैनात करण्यात आल्याचीही माहिती आहे. तर विरोधकही आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षा ही पोलिसांची प्राथमिकता असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक असणार २४ तास तैनात असणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त मोर्च्यांना परवानगी दिली असून अधिवेशन काळात जवळपास १०० मोर्चे धडकणार आहे. या मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हीलंस व्हॅन तैनात असणार आहे.
हे देखील वाचा : आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील
ठाकरे गट हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोट ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील शेतकरी गारपीट आणि अवकाळीमुळे अडचणीत सापडला आहे. या मुद्द्यावरुन देखील ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. ललित पाटील प्रकरण देखील हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून देखील हिवाळी अधिवेशनात कोविड घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळे आणि खिचडी घोटाळ्यांवरून ठाकरे गटाला लक्ष केले जाऊ शकते. यावरून ठाकरे गट देखील आक्रमक झाला असून हिवाळी अधिवेशन मुंबईच्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे.