World Bee Day : जागतिक मधुमक्षिका दिना निमित्त जाणून घ्या मधमाशीची ही वैशिष्ट्ये

World Bee Day : जागतिक मधुमक्षिका दिना निमित्त जाणून घ्या मधमाशीची ही वैशिष्ट्ये

0
World Bee Day : जागतिक मधुमक्षिका दिना निमित्त जाणून घ्या मधमाशीची ही वैशिष्ट्ये
World Bee Day : जागतिक मधुमक्षिका दिना निमित्त जाणून घ्या मधमाशीची ही वैशिष्ट्ये

World Bee Day : जागतिक मधुमक्षिका दिन (World Bee Day) मधमाशीचा मेंदू अत्यंत लहान म्हणजेच साखरेच्या कणापेक्षा लहान असतो. इतक्या लहान मेंदूद्वारे असंख्य कामाचे अचूक नियोजन ती करत असते. मधमाशीला (Bee) एकूण पाच डोळे असतात. ज्याद्वारे अतिशय दुरवरच्या वस्तू तसेच अतिशय जवळच्या वस्तूंचे सूक्ष्मातील सूक्ष्म भाग ती स्पष्टपणे पाहू शकते. मधमाशीचा ॲंटीना इतका शक्तीशाली असतो की ज्याद्वारे 300 प्रकारच्या वेगवेगळ्या चवी ती सहज ओळखू शकते.

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

मधमाशी परागीभवनाची क्रिया वेगाने घडून आणते

मधमाशीच्या शरीरावरील असंख्य केसांमुळे ती मोठ्या प्रमाणात परागकण गोळा करून परागीभवनाची क्रिया वेगाने घडून आणते. मधमाशी ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने हवेत उडू शकते व एका उड्डानात ती कमीत कमी 50 ते 100 फुलांना हमखास भेट देवूनच परत येते. एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एक चमचाभर मधाची कमाई करते. एक किलो मध तयार करण्यासाठी मधमाशांना चार लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागलेला असतो. एवढे अंतर म्हणजे जवळ जवळ पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या अंतराएवढे असते. औषधी गुणांनी समृद्ध असलेला मध बनवण्यासोबतच, पर्यावरण संतुलन राखण्यास मधमाश्या मोठा हातभार लावत असतात.

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

मधमाशी 3 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या मध गोळा करते (World Bee Day)

मधमाशी फुलांचे फळांमध्ये रूपांतर करण्याची महत्वाची भूमिका बजावत असते. शेतीउत्पादन अनेक पटींनी वाढविण्यास मधमाशी मदत करते. आग्या मोहोळासारख्या विषारी मधमाशा वगळता काही प्रजातींच्या मधमाशीचा डंख मानवी शरीरात उपयुक्त प्रतिजैविकांचे निर्माण करतो, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवितो. हे आता संशोधनातून सिद्ध झालेले आहे. म्हणुनच मधमाशीच्या डंखाचा उपयोग निसर्गोपचार पद्धतीमध्ये ब्लड प्रेशर, कॅन्सर, डायबेटिस, सांधेदुखी असे अनेक आजार बरे करण्यासाठी आता केला जावू लागला आहे. मधमाशी आपल्या पोळ्यापासून तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरातून मध व परागकण गोळा करते.

हे करत असताना वेडा राघू, कोतवालसारख्या पक्षांकडून तसेच पाली, सरडे, बेडुक, माकडे अशा प्राण्यांकडून शिकार होणे, नैसर्गिक आपत्तींना बळी पडणे अथवा वृद्धत्व अशा कारणांमुळे दररोज एका वसाहतीतील सुमारे एक हजार माशा मरण पावतात. मात्र, त्यासोबतच पोळ्यातील एकटी राणी माशी दररोज हजारापेक्षा अधिक अंडी सातत्याने घालत असते. त्यामुळे दररोज नवीन हजार मधमाशांचा जन्म होत असतो. अशा प्रकारे त्या स्वत:च्या संख्येचे संतुलन टिकवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्या या संतुलन टिकवण्याच्या प्रयत्नात सर्वांत मोठा अडथळा म्हणजे मानवी हस्तक्षेप. आधुनिकीकरणाच्या नावाने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे मधमाशांच्या एकावेळी असंख्य वसाहती नष्ट होतात. एकीकडे मानवाची वाढत चाललेली भूक व दुसरीकडे अन्नाचे उत्पादन वाढविणाऱ्या मधमाशांचा सातत्याने होणारा ऱ्हास असे हे विषम गणित असे सुरूच आहे.

मधमाश्या जैवविविधता वाढविण्यास देखील खुप मदत करतात. म्हणून, आपण मधमाश्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. यासाठी आपण आपल्या शेतात अगर बागेत मधुमक्षिका पालनाची पेटी बसवू शकतो. कीटकनाशकांचा वापर कमी करणे, आपल्या बागेत कमळ, कुमुदिनी आणि अर्जुन, करंज यांसारखी मधमाशांना -अनुकूल असलेल्या वनस्पती वाढवून आपणही मधमाशी व पर्यावरण संवर्धनास हातभार लावू शकतो.

लेखक – जयराम श्रीरंग सातपुतेनिसर्ग अभ्यासक