Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयात घडली घटना

Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयात घडली घटना

0

Share Market : नगर : शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नागरिकांची शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली फसवणूक (Fraud) करणाऱ्या आरोपीवर अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात उपस्थित लोकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस (Police) प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शेवगाव प्रकरणातील आरोपीला न्यायालयात आणल्यानंतर संबंधित ठेवीदारांनी एकच गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप करून या जमावाला बाहेर काढले. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी न्यायालयात घडली. 

नक्की वाचा : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार : मुख्यमंत्री फडणवीस

नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला नाशिक येथून नगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ठेवीदार हे न्यायालयामध्ये सकाळपासूनच हजर झाले होते. ज्या वेळेला संबंधित आरोपीला न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळेला या ठिकाणी ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरडा ओरडा सुरू केला त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलवून तत्काळ या सर्व जमावाला बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. 

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

नागरिकांनी घातला गोंधळ (Share Market)

दरम्यान या संदर्भामध्ये आरोपीचे वकील सतीश गुगळे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीला नाशिक जेलमधून जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, तेथे असलेल्या नागरिकांनी एकच गोंधळ घातला मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव केला असे त्यांनी सांगितले.