Crime Filed : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल 

Crime Filed : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल 

0
Crime Filed : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल 
Crime Filed : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल 

Crime Filed : नगर : दसऱ्याच्या दिवशी अज्ञात चोरट्यांनी (Thief) घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील सुमारे ६ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून (Theft) नेल्याची घटना शहरातील वाकोडी रस्त्यावर घडली आहे. ही घटना डॉक्टर कॉलनी येथे गुरुवारी (ता. २) रोजी रात्री ८.१५ ते १० या कालावधीत घडली.

अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

याबाबत राहुल सुनील ससाणे (वय ३१, रा. सागर व्हिडीओकॉन कंपनीसमोर, डॉक्टर कॉलनी, वाकोडी रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. 

नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र

घटनेचा तपास करत आहेत पोलीस (Crime Filed)

फिर्यादी व त्यांचे कुटुंबिय हे दसऱ्याच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासाठी महात्मा फुले चौकात गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्कंग मधील सेफ्टी डोअरचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात सर्वत्र उचकापाचक करत बेडरुममधील लोखंडी व लाकडी कपाटात ठेवलेले ६ लाख ९० हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.