Rohit and Virat:रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?

0
Rohit and Virat:रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?
Rohit and Virat:रोहित-विराटची जोडी पुन्हा मैदानात कधी दिसणार?

Rohit and Virat : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ ने बाजी मारत मालिका जिंकली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० (t-20)मालिका खेळवण्यात येणार आहे. अनेक महिन्यांनंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतासाठी एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसले.ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

नक्की वाचा : राज्यात लवकरच १७०० पदाची तलाठी भरती होणार; महसूल सेवकांसाठी राखीव पदे 

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार (Rohit and Virat)

विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?  

भारत आणि दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका  (Rohit and Virat)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना ३०नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा ३ डिसेंबर रोजी आणि तिसरा ६ डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अजून टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.