Bharat Ratna Vallabhbhai Patel : अहिल्यानगरचे मेजर निळकंठ उल्हारे यांना भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

Bharat Ratna Vallabhbhai Patel : अहिल्यानगरचे मेजर निळकंठ उल्हारे यांना भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

0
Bharat Ratna Vallabhbhai Patel : अहिल्यानगरचे मेजर निळकंठ उल्हारे यांना भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 
Bharat Ratna Vallabhbhai Patel : अहिल्यानगरचे मेजर निळकंठ उल्हारे यांना भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

Bharat Ratna Vallabhbhai Patel : नगर : राष्ट्रीय एकता दिवस व भारतरत्न वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमित्त अहिल्यानगरचे (Ahilyanagar) सुपुत्र मेजर निळकंठ उल्हारे यांना भारत मातेची अखंड २५ वर्षे केलेल्या अनमोल देशसेवा व सेवानिवृत्तीच्या नंतर केलेल्या कोरोना काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या खांद्याला खांदा लावून सलग पाच महिने मोफत सेवा प्रदान केली व तद्नंतरही सह्याद्री चौक एमआयडीसी अहिल्यानगर येथे शेकडो गरीब कामगारांना सलग दीड वर्षे मोफत अन्नदान दिले. हिंदूधर्म रक्षणार्थ प्रचार व प्रसार या माध्यमातून देशी गौवंशीय गोमातेसाठी गौशाळा सुरू केलेले आहे. या सर्व समाजसेवेबद्दल आरोग्य सेवा केंद्राचे डॉ. रविंद्र भोळे व मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचनचे मणिभाई देसाई, नीती आयोग भारत सरकार (NITI AAYOG India) यांच्या संयुक्त विद्यमानाने जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिभवन येरवडा पुणे येथे भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्काराने (Bharat Ratna Vallabhbhai Patel Hindu Ratna National Award) सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

धर्म रक्षण व समाज प्रबोधनात्मक उल्लेखनीय कार्य

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की हा राष्ट्रीय पुरस्कार २०१४ वर्षापासून कायदा व सुव्यवस्थापनेत सर्वतोपरी निस्वार्थ सेवा करणारे. भारताची एकता व अखंडता आबाधित राहावे म्हणून आपले सर्वस्व पनाला लावणाऱ्या धर्म रक्षण व समाज प्रबोधनात्मक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना प्रदान केला जातो.या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून अति विशिष्ट गौरवपूर्वक कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती (Bharat Ratna Vallabhbhai Patel)

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी, डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे हे उपस्थित होते. यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी मिळालेला सन्मानाबद्दल डॉ.रवींद्रभोळे यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली. व पुढील कार्यकाळात डॉ.रविंद्र भोळे यांना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारत सरकार दरबारी पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी संस्थेतर्फे विनंती करण्यात येईल, असे प्रतिपादन दिले.


यावेळी जयहिंद माजी सैनिक संस्था बीड जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब काळे, कार्याध्यक्ष संजय चौधरी, आष्टी तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, संघटक तुकाराम पाटोळे मेजर, एकनाथ धनवट हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार वअपंग सेवक डॉ.मणिभाई देसाई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.