Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; वाडियापार्कमध्ये ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; वाडियापार्कमध्ये ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

0

Vande Mataram : नगर : ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) या गीताच्या सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल (District Sports Complex) येथे सांस्कृतिक कार्य विभाग (Cultural Affairs Department), कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा व तालुकास्तरीय ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

अनेक मान्यवर उपस्थित

सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ या गीताचे उत्साहात समूहगायन केले. ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. यावेळी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिकचे सहाय्यक संचालक बाळासाहेब जाधव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम आदी मान्यवर उपस्थित होते.

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; वाडियापार्कमध्ये ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा
Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर; वाडियापार्कमध्ये ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

ॲड. आनंद गांधी यांनी म्हणाले, (Vande Mataram)

‘वंदे मातरम्’ गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थिनींनी सादर केलेल्या लघुनाटिकेतून देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले.

जहागीरदार यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.