Dharmendra Health Update:अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

0
Dharmendra Health Update:अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
Dharmendra Health Update:अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

नगर : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याची माहिती आहे. मात्र आज सकाळी धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट (Shift from ICU to ventilator) करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे.

नक्की वाचा: गोलीगत सूरज चव्हाण चढणार बोहल्यावर;कोण आहे होणारी बायको ?  

धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक  (Dharmendra Health Update)

मिळालेल्या माहितीनुसार,धर्मेंद्र हे काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुरुवातीला त्यांना नियमित उपचारांसाठी ठेवण्यात आले होते.  मात्र भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांना मागील काही दिवसांपासूनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही. धर्मेंद्र यांचे वय आणि पूर्वीच्या आरोग्य समस्या पाहता डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयीही विचारणा झाली असता कुटुंबीयांनी सर्वकाही ठीक असल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोती बिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती.

अवश्य वाचा: ऑस्ट्रेलियात लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी;पंतप्रधानांचा निर्णय 

धर्मेंद्र यांची कारकीर्द  (Dharmendra Health Update)

‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत. नुकतंच त्यांनी शाहिद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातकाम केलं होत. लवकरच ते ‘इक्कीस’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात ते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहे.