Dr. Nirmala Darekar : डॉ. निर्मला दरेकर यांना ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान

Dr. Nirmala Darekar : डॉ. निर्मला दरेकर यांना ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान

0
Dr. Nirmala Darekar : डॉ. निर्मला दरेकर यांना ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान
Dr. Nirmala Darekar : डॉ. निर्मला दरेकर यांना ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान

Dr. Nirmala Darekar : नगर : अहिल्यानगर येथील डॉ. निर्मला दरेकर (Dr. Nirmala Darekar) यांना मराठी साहित्य मंडळा कडून १६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील (Radhabai Kale Mahila Mahavidyalaya) रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

अनेक मान्यवर उपस्थित

हा सुरस्कार सोहळा अहिल्यानगर येथे रविवारी (ता.९) पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ . गिरीश कुलकर्णी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॅाडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्रा. डॉ. शिवाजीराव भोर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

दरेकर या १५ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेत कार्यरत (Dr. Nirmala Darekar)

डॉ. निर्मला दरेकर या गेल्या १५ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ हुन अधिक संशोधनपर लेख, ३ आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि ४ पेटंट प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे आमदार आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष स्नेहल शिंदे, प्राचार्य डॉ. शंकर थोपटे आदींनी अभिनंदन केले आहे.