Anganwadi Worker : अकोले: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi Worker) विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा (March) काढून निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या केंद्र व राज्य सरकार (Central and State Government) तसेच स्थानिक प्रशासन यांच्याकडे असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग (Women and Child Welfare Department) अहिल्यानगर जिल्ह्यातील आयसीडीएस अकोले शहरी प्रकल्प तसेच अकोले व राजूर प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्र बंद ठेऊन मोर्चात सामील झाले होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
अटी शर्तीच्या जाळ्यात प्रोत्साहन भत्ता अडकवला
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अंगणवाडी ताईंना भरघोस मानधन वाढ जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणी व अटी शर्ती लाऊन प्रोत्साहन भत्याच्या जाळ्यात अंगणवाडीताईना अडकवले व मोठी फसवणूक केली. तब्बल एक वर्षानंतर केवळ 4 ते 5 टक्के अंगणवाडी ताईंनाच प्रोत्साहन भत्ता मिळाला तोही खूपच अल्पप्रमाणात. आजच्या मोर्चात अंगणवाडी ताईंनी सरकारची लबाडी ओळखून कोणतेही निकष न लावता सर्व सेविका व मदतनीसांना सरसकट १०० टक्के प्रोत्साहन भत्ता मानधनात रुपांतरीत करून द्यावा, अशी प्रमुख मागणी केली.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
निवडणुकीची व योजना बाह्य कामे देऊ नका (Anganwadi Worker)
याशिवाय थकीत इंधन खर्च, प्रवास खर्च, अमृत आहार खर्च व थकीत इतर देणे तातडीने अदा करा, जुन्या व जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या अनेक अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत, त्यांची नव्याने उभारणी करा, नादुरुस्त अंगणवाडी केंद्र तातडीने दुरुस्त करा, कमी शिकलेल्या अंगणवाडी ताईंना त्यांचे शिक्षण व शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन कामाचा बोजा द्या, नवीन तंत्रज्ञान समजून घेणे व काम करणे शक्य नसलेल्या सेविकांना सोयीची पर्यायी व्यवस्था शासकीय खर्चाने उपलब्ध करून द्या, दिवाळीला दोन महिने होऊन गेलेत अद्याप सरकारकडून भाऊबीज जमा झाली नाही ती तातडीन द्या, अंगणवाडी कर्मचार्यांना निवडणुकीची व इतर कोणतीही योजना बाह्य कामे देऊ नका, यासह अनेक मागण्या प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या.



