Amol Jadhav : नगर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर – अमोल जाधव

Amol Jadhav : नगर तालुका मधील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर - अमोल जाधव

0
Amol Jadhav : नगर तालुका मधील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर - अमोल जाधव
Amol Jadhav : नगर तालुका मधील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर - अमोल जाधव

Amol Jadhav : नगर : बुर्‍हाणनगर पंचायत समिती गणासह नगर तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी २६ कोटी ६५ लाख रुपयांच्या आर्थिक तरतूद करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी तालुकाध्यक्ष अमोल जाधव (Amol Jadhav) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिली आहे.

अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

सयाजी शिंदे यांच्यासह घेतली अजित पवारांची भेट

अवकाळी पावसाने रस्ते खचले किंवा खड्डे पडल्यामुळे खराब झाले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते व सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली. बुर्‍हाणनगर पंचायत समिती गणा सह नगर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या समस्यांची यादी मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाधव यांच्याकडून माहिती घेऊन निधी देण्याचे मान्य केले.

Amol Jadhav : नगर तालुका मधील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर - अमोल जाधव
Amol Jadhav : नगर तालुका मधील रस्त्यांच्या कामासाठी २७ कोटी मंजुर – अमोल जाधव

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

या रस्त्यांसाठी निधीची मागणी (Amol Jadhav)

या रस्त्याच्या कामामध्ये नगर आगडगाव २.४० कोटी निंबळकचा खंडाळा, वाळुंज, नारायणगाव, कापूरवाडी, पिंपळगाव उजनी, पोखर्डी साठी ४ कोटी बुर्‍हाणनगर ते वारूळवाडी मिरवली बाबा पहाड रस्ता १,६० कोटी, नागरदेवळे, मोरेवाडी ते रतडगाव पाच कोटी ससेवाडी देवगाव चांदबीबी महाल ते रामम्मा २२२ ला मिळणारा मार्ग २ कोटी, डोंगरगण ते बहिरवाडी ससेवाडी ते पिंपळगाव उजनी प्रतिमा एक ला जोडणारा मार्ग १.०० कोटी वडगाव गुप्ता जोड रस्ता ते पिंपळगाव माळवी गावडे वस्ती या रस्त्याच्या कामासाठी १७.४० कोटी रुपये निधी देण्याची मान्य केले. देवगाव ग्रामपंचायत ते मळगंगा मंदिर ८५ लाख, टोकेवाडी-आगडगाव ते रडगाव ग्रामपंचायत रस्ता एक कोटी, बहिरवाडी बस स्टॅन्ड ते गाव्हाळ वस्ती, बहिरवाडी तलावापासून दलित वस्ती ८० लाख, पिंपळगाव उजनी ग्रामपंचायत ते स्मशान भूमी रस्ता ७५ लाख रु, पिंपळगाव उजनी ते घोरपडे वस्ती ६५ लाख, बुर्‍हाणनगर रिक्षा स्टँड ते अंबिका देवी मंदिर रस्ता ७० लाख, मोरे वस्तीचे आढाव मळा ६० लाख, वारुळवाडी ते कापुरवाडी ३.२० कोटी, असा सुमारे २६ कोटी ६५ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश मुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला दिल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.