Voting : पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

Voting : पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

0
Voting : पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे
Voting : पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

Voting : नगर : निवडणूक (Election) प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार टपाली मतदानाची (Postal voting) संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.१०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवताना मतदान प्रक्रिया कर्तव्याबरोबरच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य देखील पूर्णत्वास न्यावे, असे आवाहन यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.

नक्की वाचा: रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

महापालिकेच्या वतीने टपाली मतदान सुविधा उपलब्ध

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने शासकीय-निमशासकीय कर्मचारी कार्यरत असतात. निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असताना कर्मचाऱ्यांचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार टपाली मतदान सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तीनही प्रशिक्षणात याविषयक डांगे यांचा आवाहनाचा व्हिडिओ प्रसारित करतानाच त्यांनी याबाबत सूचना देखील केल्या.

अवश्य वाचा: महापालिका निवडणूक; प्रचार फेऱ्यांचे होणार पोलिसांकडून स्वतंत्र व्हिडिओ चित्रीकरण

निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती झाल्याचा आदेश जोडणे आवश्यक (Voting)

महापालिका क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव व नंबर तपासून ते ज्या प्रभागात मतदार आहेत त्या प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र पीबी -१ नमुन्यात आपले सूचनापत्र/अर्ज देऊन मतपत्रिकेची मागणी करावयाची आहे. यासोबत त्यांनी आपला निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती झाल्याचा आदेश जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत टपाली मतपत्रिका देण्यात येईल. संबंधित अर्जदाराने पीबी ७ मध्ये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करुन आपले मत टपाली मतपत्रिकेवर नोंदवायचे आहे. आणि सदर मतपत्रिका व अन्य आवश्यक नमुने नियमामध्ये नमूद पध्दतीने बंद लिफाफ्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पुन्हा जमा करणे आवश्यक आहे.