Akshay Kardile : नगर : मागील अतिवृष्टी मध्ये अतोनात नुकसान झालेल्या व श्री कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव येथील भाविकांसाठी अति महत्त्वाच्या बुरानगर आगडगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत तीन कोटी रुपये तसेच पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे मोहोज रस्त्यावरील ढोरा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये असा सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामी अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendraraje Bhonsle) व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
नक्की वाचा: तुम्ही दादागिरी ची भाषा मला शिकवू नका, तो धंदा आमचा : मंत्री गुलाबराव पाटील
शेतकरी, विद्यार्थी व रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता
कामत शिंगवे मोहोळ रस्त्यावरील पुलाची अनेक दिवसांपासून शेतकरी, विद्यार्थी व रहदारीच्या दृष्टीने मोठी मागणी होत होती. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना या रस्त्याने येणे जाणे अवघड होत होते, त्यामुळे नागरिकांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे मागणी केली होती.
हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले
आगडगाव देवस्थानची मागणी (Akshay Kardile)
तसेच आगडगाव येथील काल भैरवनाथ देवस्थान कडे जाणाऱ्या बुऱ्हानगर-आगडगाव रोडवर अतिवृष्टीमुळे खूप मोठे खड्डे तयार झाले होते. भाविकांना व रोज येणाऱ्या नागरिकांना घाट परिसरात तसेच बुऱ्हानगर-कापूरवाडी-आगडगाव रोडवर अनेक अपघातांना सामोरे जावे लागले होते. देवस्थाननेही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याकडे मागणी केली होती. याच मागणीचा विचार करून अक्षय कर्डिले यांनी पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे या रस्त्यासाठी निधी मागणी केली होती याची दखल घेऊन नाबार्ड अंतर्गत सदर कामांना मंजुरी देऊन शासनाने एक प्रकारे दिलासा दिला आहे. याबद्दल अक्षय दादा कर्डिले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.



