Nepti Sub-Market Committee : उपबाजार समिती वरील ‘भानुदास कोतकर’ नाव काढण्याचे आदेश

Nepti Sub-Market Committee : उपबाजार समिती वरील 'भानुदास कोतकर' नाव काढण्याचे आदेश

0
Nepti Sub-Market Committee : उपबाजार समिती वरील 'भानुदास कोतकर' नाव काढण्याचे आदेश
Nepti Sub-Market Committee : उपबाजार समिती वरील 'भानुदास कोतकर' नाव काढण्याचे आदेश

High Court : नगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात असलेल्या नेप्ती उपबाजार समितीला (Nepti Sub-Market Committee) “भानुदासजी एकनाथ कोतकर (Bhanudas Eknath Kotkar) उपबाजार समिती” असे नाव २०२४मध्ये देण्यात आले होते. हे नाव काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिले आहेत.

नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव

उपनिबंधक कार्यालयात तक्रार

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव येथील नेप्ती उपबाजार समितीला भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले आहे. या नावाला नगरसेवक अमोल येवले यांनी हरकत घेत उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली. असे नाव देणे बेकायदेशीर असल्याने ते रद्द करून फलक काढण्याचा आदेश देऊनही अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे येवले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हे देखील वाचा: मुंबई महापालिका महापौर पदासाठी हालचालींना वेग;शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

सहा आठवड्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश (Nepti Sub-Market Committee)

आता हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सहा आठवड्यात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व हितेन वणेगावकर यांनी दिले आहेत.