Narendra Firodia : अन्नछत्रालयातील तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत

Narendra Firodia : अन्नछत्रालयातील तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत

0
Narendra Firodia : अन्नछत्रालयातील तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत
Narendra Firodia : अन्नछत्रालयातील तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत

Narendra Firodia : नगर : तालुक्यातील आगडगाव (Agadgaon) येथील काळ भैरवनाथ देवस्थानातर्फे (Kalbhairavnath Temple) सुरू असलेल्या अन्नछत्रालयात वर्षभर लागणाऱ्या तेलासाठी उद्योजक तथा आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश नुकताच देवस्थानकडे सुपूर्द केला.

नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव

आगामी काळातही मदतीचे आश्वासन

आगडगाव येथे प्रत्येक रविवारी सुमारे सात ते दहा हजार भाविक बाजरीची भाकरी, आमटी असा मोफत महाप्रसाद घेतात. त्यासाठी भाविकांकडून अन्नदान केले जाते. तथापि, वाढत्या गर्दीमुळे खर्चही मोठा आहे. यासाठी फिरोदिया यांच्यातर्फे वर्षभर लागणाऱ्या तेलासाठीचा खर्च दिला जातो. त्यांनी मागील वर्षीही सहा लाखांचा धनादेश दिला होता. आगामी काळात आपण या उपक्रमासाठी मदत करू, असे त्यांनी सांगितले. हा धनादेश देवस्थानचे खजिनदार दिलीप गुगळे यांच्याकडे सोहम फिरोदिया यांनी सुपूर्द केला. या वेळी नरेंद्र फिरोदिया, गौरव भंडारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?

विविध स्वरूपात नेहमी मदत (Narendra Firodia)

फिरोदिया यांनी यापूर्वीही अनेकदा मदत केली आहे. मिनी बस, टेम्पो, रुग्णवाहिका देवस्थानला दिली. रुग्णवाहिकेतून कोरोना काळात अनेक रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. याबरोबरच वारंवार होणाऱ्या अन्नदानासाठी त्यांची कायम मदत असते.