Drug injection : अहिल्यानगर शहरात नशेचे इंजेक्शन विकणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Drug injection : अहिल्यानगर शहरात नशेचे इंजेक्शन विकणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Drug injection : अहिल्यानगर शहरात नशेचे इंजेक्शन विकणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Drug injection : अहिल्यानगर शहरात नशेचे इंजेक्शन विकणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Drug Injection : नगर : अहिल्यानगर शहरात नशेचे इंजेक्शन (Drug Injection) विकणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ११ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या ३७ बॉटल्या जप्त

रोहित रघुनाथ वंगार (वय- २५,रा. सिध्देश्वर मंदिराजवळ, बागडपट्टी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या ३७ बॉटल्या जप्त करण्यात आल्या असून असा एकूण ११ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर शहरात तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या नशेचे बॉटल्या/इंजेक्शनाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Drug injection)

त्यानुसार पथकाने सिध्देश्वर मंदिर बागडपट्टी येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे, महिला पोलीस अंमदार वंदना मोढवे यांच्या पथकाने केली.