Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगारावर छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगारावर छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

0
Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगारावर छापा; सात जणांवर गुन्हा दाखल
Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगारावर छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

Illegal Gas Refilling : नगर : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलींग (Illegal Gas Refilling), ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत विविध पोलीस (Police) ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

आराेपींविराेधात गुन्हा दाखल

उमेश विठ्ठल राऊत (वय- २८), सोनू संदिप आजबे (वय- १९, दोघे रा. सारसनगर, अहिल्यानगर), विशाल बापू गोसावी (वय- २५, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आकाश भास्कर गोसावी (वय -२७,रा. पिंपळगाव उजैनी ता. जि. अहिल्यानगर), किरण बबन दंडवते (वय- ४१, रा. सावेडी ता.जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विजय अशोक चव्हाण (वय-३८, रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर), गणेश सोन्याबापू धेडगे (वय-२५, रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर), याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

तब्बल ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Gas Refilling)

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडून तब्बल ३ लाख ३२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनील पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली.