Sayaji Shinde : बुऱ्हाणनगरला मंत्री नरहरी झिरवाळ व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत आगळावेगळा कार्यक्रम

Sayaji Shinde : बुऱ्हाणनगरला मंत्री नरहरी झिरवाळ व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत आगळावेगळा कार्यक्रम

0

Sayaji Shinde : नगर : अनमोल प्रतिष्ठानच्या वतीने नवजात बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी वेलकम किट व पर्यावरण संवर्धनासाठी बेलाचे रोप वाटप समारंभाचे आयोजन रविवारी देवी मंदिरासमोर होणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), सिने अभिनेते व देवराई प्रकल्पाचे मार्गदर्शक सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

नक्की वाचा: महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावे : गडकरी

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष कार्यक्रम

मंत्री नरहरी शिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असणारे अमोल जाधव व अनमोल प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनमोल प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, नवजात बालकांची आरोग्य उत्तम राहावे यासाठी रविवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sayaji Shinde : बुऱ्हाणनगरला मंत्री नरहरी झिरवाळ व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत आगळावेगळा कार्यक्रम
Sayaji Shinde : बुऱ्हाणनगरला मंत्री नरहरी झिरवाळ व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत आगळावेगळा कार्यक्रम

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन (Sayaji Shinde)

सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात देवराई प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले जात आहे. बुऱ्हानगर येथील बाणेश्वर मंदिर व शेजारच्या बेलेश्वर मंदिरामध्ये अनेक शिवभक्त दर्शनासाठी येतात. त्याच अनुषंगाने रविवारी वृक्षारोपणाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने बेल या रोपांचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमोल जाधव व अश्विनी जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here