Contaminated Water : आगरकर मळा, काटवण खंडोबा परिसरात दूषित पाणी 

Contaminated Water : आगरकर मळा, काटवण खंडोबा परिसरात दूषित पाणी 

0
Contaminated Water : आगरकर मळा, काटवण खंडोबा परिसरात दूषित पाणी 
Contaminated Water : आगरकर मळा, काटवण खंडोबा परिसरात दूषित पाणी 

Contaminated Water : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) प्रभाग १५ मधील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी (Contaminated Water) पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने या घटनेची तत्काळ दाखल घेऊन घ्यावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी (Newly Elected Corporator) केली आहे.

अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांना निवेदन

यावेळी नगरसेविका गीतांजली काळे, पौर्णिमा गव्हाळ, नगरसेवक दत्ता गाडळकर व सुजय मोहिते, विजय गव्हाळे व जितू गंभीर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम यांना निवेदन देण्यात आले. 

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम (Contaminated Water)

प्रभागातील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा या भागात नळाद्वारे मैलामिश्रीत व दुर्गंधीयुक्त पाणी मागील काही दिवसांपासून येत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागातील प्रलंबित नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य देत दूषित पाण्याचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.