Dead Body : कुकडी कालव्याच्या चारीत आढळला कुजलेला मृतदेह

Dead Body : कुकडी कालव्याच्या चारीत आढळला कुजलेला मृतदेह

0
Dead Body : कुकडी कालव्याच्या चारीत आढळला कुजलेला मृतदेह
Dead Body : कुकडी कालव्याच्या चारीत आढळला कुजलेला मृतदेह

Dead Body : कर्जत : कर्जत शहरातील ढेरेमळा हद्दीतील कुकडी कालव्याच्या (Kukadi Canal) चौंडीकडे जाणाऱ्या चारीत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडा (Dead Body) मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत कर्जत पोलीस (Karjat Police Station) पुढील अधिक तपास करीत आहे.

नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?

ढेरे मळा शिवारात आढळला सांगाडा

कर्जत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २७) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कर्जत शहरालगत असणाऱ्या ढेरेमळा शिवारात घटनेची खबर देणारे भूषण ढेरे हे गुरांना चारा आणण्यासाठी रानाकडे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी त्यांना बाबासाहेब खराडे यांच्या मालकीच्या शेताजवळ कुकडी कालव्याच्या चौंडीकडे जाणाऱ्या चारीत एक मानवी जातीचे प्रेत दिसले. यावेळी भूषण ढेरे यांनी जवळ जावून पाहिले असता त्यांना एक पुरुषाचा कुजलेला सांगाडा आढळून आला. ढेरे यांनी तात्काळ याबाबत कर्जत पोलिसांना खबर दिली.

अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

काही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन (Dead Body)

कर्जत पोलीस तात्काळ घटनास्थळी जात त्यांनी कुजलेल्या अवस्थेतील प्रेताला ताब्यात घेत पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या मृतदेहाबाबत कुकडी कार्यक्षेत्रातील कोणाला काही माहिती मिळाल्यास कर्जत पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.