
नगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे (Ajit Pawar Plane Crash) राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या (दि.२९) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (funeral) करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nraendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे बारामती (Baramati) येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा: अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
उद्या होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाईल.अपघाताची बातमी समजताच शरद पवार मुंबईहून तर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे दादांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांची रूग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
अवश्य वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवारांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी एक्कसवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले की,अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.”
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची उपस्थिती (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा आणि देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


