Creator Lab | शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू होणार क्रिएटर लॅब; शैक्षणिक धोरणातील बदलांची नांदी

0

Creator Lab | नगर : लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (Budget) सरकारने गेमिंग आणि कंटेंट निर्मिती क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी इनोवेशन आणि तंत्रज्ञान हे विकसित भारताचे सर्वात मोठे इंजिन असल्याचे सांगत १५०० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये एबीजीसी (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) कंटेंट क्रिएटर लॅब (Creator Lab) स्थापन केल्या जाणार आहेत. यामुळे १० लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. भारत केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही तर त्यात नेतृत्व देखील करेल. वेगाने वाढणारी क्रिएटर अर्थव्यवस्था आणि AVGC (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) उद्योगांना एकत्रित पाठिंबा मिळेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?

व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे (Creator Lab)

सरकारच्या योजनेचे उद्दिष्ट गेमिंग आणि संबंधित सर्जनशील उद्योगांमध्ये १० लाखांहून अधिक व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. यामध्ये तरुणांना उद्योगासाठी तयार कौशल्ये प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण आणि व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, करिअर पर्याय म्हणून कंटेंट आणि गेम डेव्हलपमेंटला बळकटी देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना गेम डिझाइन, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अवश्य वाचा – हाफ मॅरेथॉनमध्ये धावले नगरकर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक (Creator Lab)

अर्थसंकल्पात कंटेंट आणि गेमिंग क्षेत्रांसाठी एआय आणि नवीन डिजिटल तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित केले आहे. सुधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक नियोजित आहे, ज्यामुळे ऑनलाइन कंटेंट आणि गेमिंग इकोसिस्टम मजबूत होईल. याव्यतिरिक्त, आवश्यक उपकरणे आणि तंत्रज्ञान साधने अधिक सुलभ आणि परवडणारी बनविण्यासाठी उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना अपेक्षित आहेत. 

अर्थसंकल्पात एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचे वर्णन अर्थव्यवस्थेसाठी पॉवर बूस्टर म्हणून केले आहे, ज्यामुळे कंटेंट निर्मितीच्या पद्धतींमध्ये आणखी सुधारणा होणार असून, उत्तम इंटरनेट आणि पायाभूत सुविधांसाठी सरकारने पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींची तरतुद केली आहे. ज्यामुळे देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल नेटवर्क आणखी मजबूत होईल. तरुणांना नवीन तंत्रज्ञान शिकवण्यावर आणि भविष्यातील नोकऱ्यांसाठी त्यांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. डिजिटल आणि क्रिएटिव स्किल्स शिकवण्यासाठी पाच नवीन टाउनशिप विकसित केल्या जाणार आहे, जिथे अभ्यासासोबतच कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी विद्यार्थांना मिळणार आहे. गेमिंग स्टार्टअप्स आणि लहान कंपन्यांना मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here