Akash Jadhav | अहिल्यानगरचा सर्पमित्र आकाश जाधव गांजा तस्करीत जेरबंद; पुन्हा एक रिलस्टार गुन्हेगार?

0

Akash Jadhav | नगर: अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे येथील सर्पमित्र आकाश जाधव (Akash Jadhav) याला छत्तीसगड पोलिसांनी गांजा तस्करीत ताब्यात घेतले आहे. तो गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड निघाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातून गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सर्पमित्राच्या आड गांजा तस्करीचे रॅकेट चालविले जाते का अशी शंकाही वर्तवली जात आहे. आकाश जाधव हा रिलस्टार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिलस्टार गुन्ह्यात गजाआड झाल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा – शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू होणार क्रिएटर लॅब; शैक्षणिक धोरणातील बदलांची नांदी

युट्युबवर ५६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स

सोशल मीडियावर सर्पमित्र आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका नामवंत युट्यूबरचा खरा चेहरा आता समोर आला आहे. सापांना जीवनदान देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींच्या गांजाची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी अटक केली आहे. आकाश जाधवचे युट्युबवर ५६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. काही दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील कोमल काळे ही रिलस्टार चोरीच्या गुन्ह्यात गडाआड झाली होती. आता आकाश जाधव हा गांजा तस्करीत जेरबंद झाला आहे. 

अवश्य वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?

नऊ आरोपींना बेड्या ठोकल्या (Akash Jadhav)

अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत आतापर्यंत एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात गांजाची घाऊक विक्री करणारे, वाहतूक करणारे आणि किरकोळ पुरवठा करणारे अशा सर्वांचा समावेश आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात असे, जेणेकरून कोणत्याही चेकपोस्टवर संशय येणार नाही.

गांजा तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर (Akash Jadhav)

७ जानेवारी रोजी छत्तीसगड येथील महासमुंद पोलिसांनी संशयावरून एका रुग्णवाहिकेची झडती घेतली होती. यात रुग्णवाहिकेतून तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. सुरुवातीला ३ तस्करांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आकाश जाधव असल्याचे उघड झाले. लोकप्रियतेच्या आणि विश्वासाच्या आडोशाने तो ओडिशावरून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने गेल्या वर्षभरात ६ ते ७ वेळा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गांजाची ने-आण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here