Raid : जिल्ह्यात सुरु असलेल्या २९ अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दोन लाख ८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Raid : जिल्ह्यात सुरु असलेल्या २९ अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दोन लाख ८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

Raid : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) कारवाई करत अवैध दारू विक्री तसेच जुगार व ऑनलाईन बिंगोवर छापे (Raid) टाकले आहेत. या कारवाईत एकूण तब्बल २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ८६ हजार ७० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा: शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

जिल्हाभरात व्यापक मोहिम

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथकांची निर्मिती करून जिल्हाभरात व्यापक मोहिम राबविण्यात आली. २४ ते ३० जानेवारी या कालावधीत पथकांनी शेवगाव, एमआयडीसी, बेलवंडी, सुपा, पारनेर, सोनई, नेवासा, लोणी, अकोले, राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी, विदेशी तसेच गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांविरूध्द कारवाई केली.

अवश्य वाचा: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?

१० ठिकाणी छापे (Raid)

या मोहिमेत १९ ठिकाणी छापे टाकून १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन लाख २४ हजार १५० रूपये किमतीची दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याच कालावधीत तोफखाना, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुका, अकोले, कोतवाली, कोपरगाव शहर, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार व ऑनलाईन बिंगो खेळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या अंतर्गत १० ठिकाणी छापे टाकून १० गुन्हे दाखल करण्यात आले असून ६१ हजार ९२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.