Jyoti Gade & Dhananjay Jadhav | युतीचे ठरले; अहिल्यानगर महापौर पदासाठी ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0

Jyoti Gade & Dhananjay Jadhav | नगर : अहिल्यानगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महापौर व उपमहापौर पदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी आज (ता. २) सकाळी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर उपमहापौरपद भाजपला देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे (Jyoti Gade)  तर भाजपकडून धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ते थोड्याच वेळात महापालिकेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हेही वाचा – आयुष्मान भारताच्या निर्मितीला आणखी गती देणारा अर्थसंकल्प – अनुजा साळवी

ज्योती गाडेंची ही तिसरी टर्म (Jyoti Gade & Dhananjay Jadhav)

ज्योती गाडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसऱ्या वेळी नगरसेवक झाल्या आहेत. त्या माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या तर आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या हयातीत त्यांचे जावई संदीप कोतकर व संग्राम जगताप हे महापौर, कन्या सुवर्णा कोतकर या उपमहापौर तर त्यांच्या दोन कन्या ज्योती गाडे व शीतल जगताप या नगरसेवक राहिल्या आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्येला मंत्री विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी विराजमान करत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली असल्याची चर्चा शहरात आहे.

अवश्य वाचा – अजित पवारांच्या आजोळी श्रद्धांजली सभा; सत्यजित व शैलेंद्र कदम ढसाढसा रडले

उच्च शिक्षित उपमहापौर (Jyoti Gade & Dhananjay Jadhav)

उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते वकिली व व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतलेले नगरसेवक आहेत. त्यांचा अभ्यास व अनेक वर्षांपासूनचा अनुभव पाहता ते या पदाला न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला. धनंजय जाधव हे विखे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील शहराचे नगराध्यक्ष होते. जाधव कुटुंब हे अहिल्यानगर शहरातील मातब्बर राजकीय कुटुंब समजले जाते. धनंजय जाधव हे या कुटुंबाचे तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार आहेत. मितभाषीय व मनमेळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले धनंजय जाधव हे उपमहापौर होणार असल्याने तोफखाना परिसरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here