Environmental Conservation : नगर : सध्याच्या काळात तांत्रिक आणि सामाजिक बदल लक्षात घेऊन दादा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. समाजाला अशा पद्धतीने सकारात्मक विचाराकडे नेणाऱ्या प्रयत्नांची गरज आहे. व्यसनमुक्तीसह पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation), स्किल इंडिया (Skill India) व रोजगार निर्मितीसारख्या महत्वाच्या उपक्रमांमुळे तरूणांसह महिलांचे सक्षमीकरण होईल. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे मत सरला बेट येथील रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार : पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
शिबिरात अनेकांनी रक्तदान केले रक्तदान
दादा फाउंडेशनतर्फे देहरे (ता. नगर) येथे शनिवारी (दिनांक ३१ जानेवारी २०२६) आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजारो नागरिकांना रामगिरी महाराज यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. यासह उपस्थित दोन हजार नागरिकांना वृक्षरोपाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, मंत्रालय उपसचिव चेतन निकम, मढी देवस्थानाचे विश्वस्त तानाजीराव धसाळ, भाजपचे सरचिटणीस नितीन कापसे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, फाउंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक वैभव धसाळ, विश्वस्त वैभव खांडरे, सचिव डॉ. योगेश कटारे, माजी पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, विठ्ठल पटारे, जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त दीपक दरे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, रघुनाथ करंडे, हभप गीताताई धसाळ, मार्केट कमिटीचे संचालक रंभाजी सुळ, हभप भाऊसाहेब महाराज बंगे, श्रीहरी महाराज काळे, सूत्रसंचालक गणेश हापसे आदि उपस्थित होते.

अवश्य वाचा – युतीचे ठरले; अहिल्यानगर महापौर पदासाठी ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, (Environmental Conservation)

दादा फाउंडेशन या संस्थेने हाती घेतलेले उपक्रम समाजाला उन्नतीकडे नेणारे आहेत. व्यसनमुक्ती ही गरज आहे. यामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक वैभव धसाळ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, देहरे गावाचे माजी सरपंच आणि आमचे वडील कै. लक्ष्मण धसाळ यांच्या विचारांनुसार दादा फाउंडेशन काम करणार आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आम्ही या उपक्रमांची सुरुवात केली आहे. नगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांना मोफत आणि गरजेनुसार थेट गावोगावी जाऊन आमची संस्था काम करणार आहे. गावोगावी व्यसनमुक्तीची शपथ देण्यासह रोपांचे वाटप आणि कौशल्य प्रशिक्षण यांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी संस्थेकडे संपर्क साधावा.

हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?



