नगर: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड (Technical malfunction in the helicopter) झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरहुन उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election) प्रचारासाठी मुंडे या लातूर दौऱ्यावर जाणार होत्या.
मात्र टेक ऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड झाला असल्याचे निष्पन्न झालं आहे. परिणामी,पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडें या लातूर येथील सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा: सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय;दररोज गावासाठी राष्ट्रगीत लागणार
‘मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते’ (Pankaja Munde)
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे आज (ता.३) लातूरसह सोलापुरला जाणार आहे. सोलापुरातील मंद्रूप आणि कुंभारी अशा दोन ठिकाणी संध्याकाळी ६ आणि ८ वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. काल (ता.२) पंकजा या छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेसाठी वाळूज परिसरात सभा घेतली होती. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते’,असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशातच आज सकाळी त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यापूर्वीच त्यात बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
अवश्य वाचा: महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल!गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवास लांबणीवर (Pankaja Munde)
मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा पुढील प्रवास लांबला आहे. परिणामी, दुसरे हेलिकॉप्टर आल्यावर मंत्री पंकजा मुंडे या निर्धारित प्रवासाला निघणार असल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यात नुकत्याच झालेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघाताने अवघ्या महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या विमान अपघाताबाबत अनेकांनी या अपघातांवर संशय व्यक्त करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.



