
Anti-Corruption Department : नगर : न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) मिळकतीचे वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याच्या आदेशासाठी तक्रारदाराकडून सात हजाराची लाच (Bribe) घेतल्याचा प्रकार कोपरगाव तहसील कार्यालयात समोर आला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) महिला महसूल सहाय्यकास ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
सात हजारांची लाचेची मागणी
अंजना पंडित पवार (वय ३६), असे लाच घेतलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हकीकत तक्रारदार यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नमूद मिळकतीचे वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी सात हजारांची लाचेची मागणी कोपरगाव तहसील कार्यालयातील सहायक महसूल अंजनी पंडित पवार यांनी केली.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
लाच घेताना घेतले ताब्यात (Anti-Corruption Department)
मात्र, तक्रारदार यांनी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून लाच मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला सात हजाराची लाच घेताना ताब्यात घेतले. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रिक, वैभव सुपेकर, हारून शेख यांच्या पथकाने केली.


