Movement : कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन

Movement : कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन

0
Movement : कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन
Movement : कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन

Movement : कर्जत : कर्जत शहरास संत सदगुरु गोदड महाराज (Sant Sadguru Godad Maharaj) नगरी नाव मिळावे. यासह प्रभाग क्रमांक-९ दलित वस्ती जाहिर करावी. शहरात अनेक प्रभागात नागरी समस्या असून त्या तात्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश प्रवक्ते तथा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अ‍ॅड. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२) कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन (Movement) करण्यात आले. यावेळी भाजपचे युवक नेते सचिन घुले आणि नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियंका मेहेत्रे यांनी लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगित केले.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

विविध मागण्यांसाठी आंदोलन

कर्जत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (ता.२) प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी कर्जत नगरपंचायतीसमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जत शहरास श्री संत गोदड महाराज नगरी नामकरण करा, प्रभाग क्रमांक ९ दलित वस्ती घोषित करीत त्या ठिकाणी नागरीसुविधा मिळाव्या. सिध्दार्थनगर व शहरातील शासकीय कार्यालयातील शौचालयाची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्रे निर्माण करावी. तसेच प्रत्येक उपनगरात बौध्दांसाठी बुध्दविहार, हिंदु बांधवासाठी मंदिर आणि ज्या ठिकाणी मुस्लीम समाज आहे, त्या ठिकाणी मशिदीसाठी खुल्या जागेत जागा मिळावी, कर्जत शहरातील शहा गार्डन शेजारी कै. प्रमोद महाजन अभ्यासिका केंद्राचे बांधकाम अपुर्ण अवस्थेत आहे त्याचे काम तात्काळ पूर्ण करून लोकार्पण करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली.

हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?

सकारात्मक चर्चा करीत लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित (Movement)

यावेळी मुख्याधिकारी कर्जत यांच्या अनुपस्थित बाबत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाजपाचे युवक नेते सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल आणि कार्यालयीन अधीक्षक प्रियंका मेहेत्रे यांनी आंदोलनकर्त्याशी सकारात्मक चर्चा करीत लेखी पत्र देत आंदोलन स्थगित करण्यात यश मिळवले. यावेळी वंचितचे सोमनाथ भैलुमे, वृद्ध शेतमजूर भूमीहीन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, अनिल समुद्र यांची भाषणे झाली. रासपा तालुका अध्यक्ष सोनू भिसे, शिवसेना उबाठा गटाचे अमोल क्षीरसागर, रिपाइं गटाचे युवानेते विशाल काकडे यांनी ढोल-ताशा बजाव आंदोलनास आपला पाठिंबा दिला.