Ramayan Movie:प्रतीक्षा संपली!रणबीर कपूरचा ‘राम अवतार’ या दिवशी होणार प्रदर्शित

0
Ramayan Movie:प्रतीक्षा संपली!रणबीर कपूरचा ‘राम अवतार’ या दिवशी होणार प्रदर्शित
Ramayan Movie:प्रतीक्षा संपली!रणबीर कपूरचा ‘राम अवतार’ या दिवशी होणार प्रदर्शित

नगर: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘रामायण’ (Ramayan Movie) हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. आतापर्यंत चित्रपटातील कोणत्याही पात्राचा लूक समोर आलेला नाही. मात्र आता निर्माते प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवणार असल्याचं दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,रामायणच्या टीमकडून मार्च महिन्यात एक भव्य इव्हेंट (Grand Event) आयोजित करण्यात येणार आहे. हा चित्रपटाचा पहिला अधिकृत इव्हेंट असेल, ज्यामध्ये प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूक रिव्हील (First look revealed) केले जाणार आहेत.

नक्की वाचा:  उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

रामायण या चित्रपटात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला रणबीर कपूरने साकारलेल्या रामाच्या भूमिकेवरून बराच वाद झाला होता. मात्र रणबीर कपूरने रामाची भूमिका करावी की नाही याबद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. जेव्हा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि रणबीर कपूरची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली होती, तेव्हा अनेकांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

कुठे होणार ग्रँड इव्हेंट? (Ramayan Movie)

माहितीनुसार, हा इव्हेंट गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला जाणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांनी यासाठी निमंत्रणे पाठवायला सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे. आता चित्रपटातील स्टारकास्टपैकी नेमके कोण उपस्थित राहणार हे अजून निश्चित नसले तरी  रणबीर कपूर, साई पल्लवी, रवि दुबे आणि यश हे प्रमुख कलाकार यामध्ये असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा: साई भक्तांना दिलासा!साईबाबांच्या मूर्तीबाबतचा अहवालात ‘या’ गोष्टी आल्या समोर   

चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित (Ramayan Movie)

‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार, रामायणचा हा इव्हेंट राम नवमीच्या दिवशी,२७ मार्चला गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला जाणार आहे.माहितीनुसार, या इव्हेंटसाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. रामायण पार्ट १ हा चित्रपट यंदा दिवाळीला मोठ्या रिलीज म्हणून चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वाल्मीकींच्या रामायणावर आधारित आहे. प्रसिद्ध हिंदू महाकाव्याची कथा मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारत आहेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असून, रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.