Life Imprisonment : नगर : शेवगाव तालुक्यातील चापडगाव माथा शिवारात जुन्या वादातून कुऱ्हाडीने वार करत खून (Murder) करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने (District and Additional Sessions Court) दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे. जालिंदर आसाराम गायके (वय ५०), बाळासाहेब आसाराम गायके (वय ४६), तुकाराम ज्ञानदेव गायके (वय ४२, सर्व रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्यातील जखमी साक्षीदार (Witness) व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा मानण्यात आला आहे.
अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
याबाबत हकीकत अशी की,
फिर्यादी नानासाहेब बाळासाहेब गायके व त्यांचे वडील बाळासाहेब अश्रू गायके हे मजुरी काम करतात. ४ मे २०१९ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे वडील व ते ज्यांच्याकडे काम करत होते. ते काकडे मिस्त्री यांच्या दुचाकीवरून काम संपवून घरी जात होते. चापडगाव माथा शिवारात त्यांच्या भावकीतील जालिंदर आसाराम गायके, रामदास पंढरीनाथ गायके, गणेश जालिंदार गायके, तुकाराम नामदेव गायके यांनी हातातील लोखंडी गज, कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत बाळासाहेब अश्रू गायके हे गंभीर जखमी झाले. फिर्यादी व त्यांचे वडील यांना जास्त मार लागल्याने जमलेल्या नागरिकांनी पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव
तिन्ही आरोपींना दोषी ठरवत सुनावली जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment)
याबाबत तोफखाना पोलिसांनी जबाब नोंदवून गुन्हा शेवगाव पोलिसात वर्ग केला. तापसी अधिकारी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये तपासा दरम्यान एकूण सात आरोपी निष्पन्न करण्यात आले. त्यापैकी दोन आरोपी हे विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांच्या विरुध्द वेगळा खटला चालविण्यात येत आहे. खटल्यात अभियोग पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार नोंदविण्यात आले. आरोपीविरुध्द न्यायालयाचे रेकॉर्डवर आलेला कागदोपत्री पुरावा, तोंडी पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचा साक्षीपुरावा तसेच रासायनिक तपासणी अहवाल व जखमी फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण मानून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय बेरड व शेवगाव पोलीस ठाण्याचे अशोक बेळगे यांनी सहाय्य केले.



