Niramala Sitaraman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी २०२६ चा अर्थसंकल्प (2026 budget) सादर करताना केवळ आर्थिक धोरणांवरच नाही, तर भारतीय परंपरेवरही पुन्हा एकदा ठसा उमटवला. मागच्या ९ वर्षांत प्रत्येक बजेटवेळी त्यांनी परिधान केलेली साडी (The saree worn during the budget presentation) ही केवळ कपड्यांची निवड न राहता, देशाच्या हातमाग, संस्कृती आणि स्थानिक कारागिरांच्या कलेचं प्रतीक ठरली आहे. आज आपण त्यांनी मागील अर्थसंकल्पात परिधान केलेल्या साड्या आणि त्यांची खासियत पाहणार आहोत.
नक्की वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
९ वेळा अर्थसंकल्पात परिधान केलेल्या साड्या कोणत्या? (Niramala Sitaraman)
१. बजेट २०१९ – गुलाबी मंगलगिरी साडी – २०१९ ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता, यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी निवडली होती.

२. बजेट २०२० – गोल्डन यलो सिल्क साडी – २०२० चं बजेट मांडताना निर्मला सीतारामन यांनी गडद पिवळी साडी नेसली होती. पिवळा रंग हा समृद्धी आणि आशेचे प्रतीक आहे, जो आव्हानांमध्ये आर्थिक पुनर्प्राप्ती दर्शवितो.

३. बजेट २०२१ : लाल-पांढरी पोचमपल्ली साडी – २०२१ चं बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी तेलंगणाची प्रसिद्ध असलेली पोचमपल्ली इकत कलेची साडी आणि त्यावर ‘कश्मीरी पश्मीना’ शाल परिधान केली होती. यात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुंदर मिलाफ होतो. या साडीत हिरव्या बॉर्डरसह लाल आणि ऑफ-व्हाइट रंगात भौमितिक डिझाइन होते, जे भारतीय कारागिरीचे एक सुंदर उदाहरण होते.
४. बजेट २०२२ – बोमकाई माती रंगाची साडी :- २०२२ चे बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओडिसाची बोमकाई साडी परिधान केली, जी गडद तपकिरी रंगाची पारंपारिक हातमाग कला केलीली साडी होती. यामुळे स्थानिक कारागिरांचे काम आणि शतकानुशतके जुन्या विणकाम परंपरांना प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली संदेश या साडीतून देण्यात आला. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि ‘जमिनीशी जोडलेल्या’ धोरणांना या साडीच्या माध्यमातून महत्त्व देण्यात आले.
अवश्य वाचा: सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय;दररोज गावासाठी राष्ट्रगीत लागणार
५. बजेट २०२३ – लाल सुंदर साडी – २०२३ मध्ये कर्नाटकच्या धारवाडमधील ‘कसुती’ एम्ब्रॉयडरी असलेली लाल साडी निर्मला सीतारामन यांनी परिधान केली होती. ‘नारी शक्ती’चे संयमी स्वरुप दर्शविणारी ही साडी होती. या साडीत सुंदर सोन्याचं जरीकाम आणि काळ्या बॉर्डरवर पारंपारिक कसुती भरतकाम होते. हे क्लासिक भारतीय शैलीचे एक अद्भुत उदाहरण होते.
६. बजेट २०२४ – जांभळी पांढरी सुंदर सिल्क साडी व निळी ‘कान्था’ वर्क सारी – २०२४ च्या अंतरिम निवडणुकीपूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या ‘कान्था’ वर्कची निळी साडी नेसली होती. निळा रंग हा स्थिरता आणि डिजिटल क्रांतीचा मार्ग दाखवतो. तर २०२४ च्या जुलै महिन्यातील पूर्ण बजेटमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील पांढरी मंगलगीरी साडी निवडली होती. पांढरा रंग हा स्वच्छ प्रतिमेचे प्रतीक आहे.
७. बजेट २०२५ – ऑफव्हाईट मधुबनी सिल्क सारी – पद्मश्री पुरस्कार विजेत्या मधुबनी कलाकार दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी पेंटिंगची साडी २०२५ मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली होती. बिहारच्या सांस्कृतिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. पारंपारिक मत्स्य आकृतीनी सजवलेली ही साडी होती. ही साडी बिहारच्या समृद्ध लोककलांना उजाळा देते आणि हातमाग परंपरेला जोरदार प्रोत्साहन देते.
८. बजेट २०२६ – कट्टम कांजीवरम साडी – यंदा म्हणजे २०२६ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आपल्या मूळ राज्याची म्हणजेच तामिळनाडूची कांजीवरम सिल्क साडी निवडली होती. ही साडी मॅजेंटा रंगाची असून तिला गडद तपकिरी बॉर्डर आहे. यावर खास लोकरीची शाल त्यांनी परिधान केली आहे.ही साडी तमिळनाडूच्या प्रसिद्ध हातमाग वारशाचा भाग आहे आणि ती भारतातील सर्वात शाही आणि टिकाऊ साड्यांपैकी एक मानली जाते. अर्थसंकल्पासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रसंगासाठी हा पेहराव अत्यंत समर्पक वाटत होता.
अश्या पद्धतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये परिधान केलेली साडी ही भारतातील कोणत्या ना कोणत्या राज्याची कला, विणकाम आणि कारागिरांच्या कष्टाला राष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळवून देते. याच कारणामुळे त्यांच्या साड्या केवळ एक पेहराव नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक बनल्या आहेत.



