Accident : नगर-कल्याण रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Death : नगर-कल्याण रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
Accident : नगर-कल्याण रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Accident : नगर-कल्याण रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Death : नगर : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) नेप्ती शिवारात घडली आहे. सागर धोंडीभाऊ केदार (रा.निमगाव वाघा, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिली जोरात धडक

याबाबत मयताचे चुलत भाऊ गुलाब विठ्ठल केदार (रा. निमगाव वाघा, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. निमगाव वाघा येथील रहिवासी सागर केदार हे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. रात्री पावणेआठच्या सुमारास नेप्ती शिवारातील सागर भेळ सेंटरजवळ आले असता, मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सागर यांचा गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला.

नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Accident)

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदीश जंबे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.