Ahilyanagar | एका बड्या नेत्याच्या वाहनाला दुचाकीचा कट अन् अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार

0

Ahilyanagar | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील टिळक रस्ता परिसरात एका बड्या नेत्याच्या वाहनाला दुचाकीने कट मारला आणि शहरात मध्यरात्री सुरू झाला पाठलागाचा थरार. त्यामुळे काल (ता. ४) रात्री माळीवाडा व झेंडीगेट परिसरात तणावाचे वातावरण होते. 

हेही वाचा – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा 

बड्या नेत्याच्या कारला धक्का (Ahilyanagar)

काल (ता. ३) रात्री ९.३० वाजता टिळक रस्त्याच्या एका टोकाला एक बड्या राजकीय नेत्याची कार जात होती. त्याच वेळी एका मोपेडवर बसलेले तीन तरुण आपल्याचं आनंदात वाहनांना कट देत वेगात निघाले होते. त्यांच्या दुचाकीचा नेमका बड्या नेत्याच्या कारला धक्का लागला. कट लागताच कारमधून बडा नेता व त्याचे समर्थक बाहेर येताच तिघे तरुण घाबरले. नेत्या बरोबर असलेल्या पोलिसांनी त्या दुचाकीवरील एकाला पकडले. उर्वरित दोघांनी दुचाकीवर धूम ठोकली. हे पाहताच पोलिसांनी रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकींना अडवले. अडवलेल्या दुचाकीवर बसत चालकांना पळून गेलेल्या दुचाकींचा पाठलाग करण्यास सांगितले.

अवश्य वाचा – लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पोलिसांचा पाठलाग (Ahilyanagar)

तरुणांची दुचाकी खुपच वेगात होती. त्यांच्या मागे दोन अडवलेल्या दुचाकीवरून पोलीस तरुणांचा पाठलाग करत होते. तरुणांनी वाडिया पार्क समोरील महात्मा गांधी पुतळ्या समोर असलेल्या रस्त्यावर मोपेड थांबवत आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना याची खातर जमा केली. त्यांना पोलीस दुचाकीवरून येत असल्याचे कळाले. त्यामुळे अधिक घाबरलेल्या तरुणांनी शहरातील अरुंद गल्ल्यांतून जाण्यास सुरुवात केली. हा वाहनांच्या वेगाचा थरार पाहून नक्की काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली.

भोपळे गल्लीत पाठलाग (Ahilyanagar)

तरुणांनी मोपेड भोपळे गल्लीमध्ये जाताच पोलिसांनीच्या दुचाकीही भोपळे गल्लीत तरुणांचा पाठलाग करू लागल्या. तरुणांनी मोपेड  विशाल गणपती, कौठीची तालीम, वसंत टॉकीज, बाबा बंगाली चौक मार्ग झेंडी गेटच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी बाबा बंगाली पर्यंत पाठलाग केला. मात्र, त्यांच्या हाती तरुण लागले नाही. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तो पर्यंत शहरातील माळीवाडा व झेंडीगेट परिसरात बड्या नेत्याचे कार्यकर्ते गोळा झाले. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी तेहसीन शेख यांच्या फिर्यादीवरून अलिस मुनाफ कुरेशी (वय २०) व त्यांच्या मित्रांविरोधात बेजबाबदारपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here